जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । पाचोरा शहरातील १८ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोहीणी प्रविण मिस्तरी (वय १८) हिने दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आई, वडिल बाजारात गेले असता घरात एकटीच असतांना घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सदर प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
दरम्यान रोहीणी हिस तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रोहिणी हिची प्राण ज्योत मालवली होती. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहिणी हिने आत्महत्या का केली ? या मागील कारण स्पष्ट होवु शकले नाही. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहे. रोहिणी हिच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. रोहिणी हिचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.
.