जळगाव जिल्हाभुसावळ

विजय फिरके ठरले हाफ आयर्नमॅन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ येथील स्पोर्ट्स अ‍ॅण्ड  रनर्स असोसिएशनचे सदस्य विजय फिरके  यांनी पुण्याजवळील मंचर भीमाशंकर रोडवर असलेल्या डिंभे धरणात आयोजित 1.9 किमी स्विमिंग तसेच 90 किलोमीटर सायकलिंग व 21 किलोमीटर रनिंग हे तिन्ही क्रीडा प्रकारात नऊ तासात पूर्ण करून हाफ आयर्नमॅन हा किताब पटकावत भुसावळ शहराचे नाव देशपातळीवर झळकवले आहे. फिरके यांनी ही स्पर्धा आठ तास 45 मिनिटात पूर्ण केली.

देशभरातील स्पर्धकांचा सहभाग होता प्रतिकूल वातावरणात व अतिशय आव्हानात्मक रस्त्यावर 150 स्पर्धक या स्पर्धेसाठी देशभरातून सहभागी झाले.  त्यापैकी साधारणतः 10 स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करू शकले नाहीत. विजय फिरके हे शहरातील उत्कृष्ट जलतरणपटू आहेत. त्याचबरोबर ते सायकलिंगच्या विविध बीआरएम स्पर्धांमध्ये आतापर्यंत यशस्वी झाले आहेत. बडोदा ते कछ हे गुजरात धील 1000  किलोमीटर सायकलिंगचा त्यांचा पराक्रम देखील समाविष्ट आहे  शिवाय रनिंगमध्ये विविध ठिकाणच्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदविलेला आहे. या सततच्या सरावामुळे ते यशस्वी ठरलेत, असे प्रा.प्रवीण फालक म्हणाले. यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button