⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | ट्रॅव्हल्सच्या प्रवासात सांभाळून : भाजप नगरसेवकाच्या ४० लाखांच्या बॅगवर डल्ला

ट्रॅव्हल्सच्या प्रवासात सांभाळून : भाजप नगरसेवकाच्या ४० लाखांच्या बॅगवर डल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । चोरटा कुठून डल्ला मारेल हे सांगणे कठीण आहे. भुसावळ येथील उद्योगपती तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज बियाणी यांच्या मालकीची ४० लाख रूपयांनी भरलेली बॅग प्रवासातून चोरण्यातआल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, नगरसेवक मनोज बियाणी यांचे सहकारी २८ मार्च २०२ रोजी भुसावळ येथून बँगेत चाळीस लाख रूपये घेऊन एका ट्रॅव्हल्समधून मुंबई येथे निघाले होते. दरम्यान, संबंधीत व्यक्तीला झोप लागल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी ही बॅग लांबविली. या फिर्यादीनुसार मनोज बियाणी यांचे निकटवर्तीय संजय पुरूषोत्तम तिवारी (रा. मधु डेअरी समोर, विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ) हे संगीतम ट्रॅव्हलच्या एमएच०३ सीपी – ३४७७ क्रमांकाच्या लक्झरी गाडीतून पाचशेच्या नोटांनी भरलेली बँग घेऊन निघाले होते. त्यांनी ही बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. मात्र रात्री त्यांना झोप लागल्याने कुणी तरी अज्ञात चोरट्याने ही बॅग लंपास केली आहे.

दरम्यान, या संदर्भात मनोज बियाणी यांनी २३ एप्रिल रोजी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीसात फिर्याद दिली. यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोटला हे करीत आहेत. इतकी मोठी रक्कम चोरी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह