दिलासादायक ! भुसावळसह जळगावला थांबा असलेल्या विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

एप्रिल 8, 2024 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सध्या उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता भुसावळसह जळगावमार्गे जाणारी काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे एक्स्प्रेस आता एप्रिलपर्यंत धावणार आहे.

train jpg webp

रेल्वे क्रमांक ०७०५३ काचीगुडा-लालगढ १३ ते १७ एप्रिलपर्यंत दर शनिवारी काचीगुडा येथून ९.३० वाजता सुटेल. तर लालगढ येथे दुपारी १३.३५ वाजता पोहोचले. रेल्वे क्रमांक ०७०५४ लालगढ-काचीगुडा दर मंगळवारी प्रस्थान स्थानकावरून रात्री १९.४५ निघेल. काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९.४० वाजता पोहोचेल. ही रेल्वे १६ ते ३० एप्रिलपर्यंत धावेल.

विशेष एक्स्प्रेस कामारेड्डी, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिक, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, अबरोड, जोधपूर मार्गे धावेल. भुसावळ विभागातील प्रवाशांना या विशेष एक्स्प्रेसचा फायदा होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now