⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | धरणगावचे चित्रकार योगेश सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

धरणगावचे चित्रकार योगेश सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dharangaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ ।  धरणगावचे सुपुत्र तसेच खान्देशातील प्रसिध्द चित्रकार योगेश सुतार यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान नुकताच जाहीर झाला आहे.

मागील २४ वर्षापासून शिक्षण, कला क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षण शिबीर, चित्रकला विषयक मार्गदर्शन शिबीर राबविली म्हणून योगेश सुतार यांना हा सन्मान मिळाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन युवा सेना-मविसेचे प्रदेशाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांनी केले. तपशिल ज्युरी सदस्यांनी निवड केली. पुरस्कार वितरण पुढील महिन्यात होणार आहे. नाशिक येथील पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निर्वाण फाॅऊडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील कार्यासाठी इंडिया बुकमध्ये नोंदणी असेल. शासकीय कार्यालयात महापुरुषांची चित्र स्मारकांची कामे केल्याची दखल घेत जिल्ह्यातून निवड करण्यात आली. त्यात योगेश सुतार यांचा समावेश झाला, हे जळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. योगेश सुतार यांच्या चित्रप्रदर्शनाचे तसेच चित्रशैलीची विशेष लोकप्रियता असून खान्देशात तसेच राज्यातही त्यांच्या चित्रस्मारकांची मागणी आहे.

राज्याबाहेरही त्यांनी चित्रांचे प्रदर्शन केले आहेत. प्रदर्शनातील कलाकृतीचे निरीक्षक म्हणुनही त्यांचे योगदान आहे. विद्यार्थी घडवणारे सुतार यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. त्यांनी पोलीस दलासाठी योगदान देताना गुन्हेगारांची रेखाचित्रे काढल्याने गुन्हेगाराची ओळख पटविण्यात खूपच मदत झाली आहे. जळगाव येथे चित्र प्रदर्शनात अनेक चित्रे असून ते रचनाचित्र अमूर्त शैलीतील चित्रे असून वेगवेगळ्या रंगसंगतीतील मनमोहक भावनांना हात घालणारी आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह