7वी पास उमेदवारांना मिळेल तब्बल 47000 पगार ; नोकरीची ही संधी सोडू नका, आताच अर्ज करा

ऑक्टोबर 19, 2022 12:51 PM

Bombay High Court Recruitment 2022 : तुम्ही जर 7वी देखील पास असाल आणि नोकरीचा शोध घेत असाल तर ही संधी सोडू नका. बॉम्बे हायकोर्ट (BHC) मध्ये नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. बॉम्बे हायकोर्टमध्ये रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे. Bombay High Court Bharti 2022

job 1 jpg webp

एकूण जागा : ०२

कोणत्या पदासाठी होणार भरती?
बॉम्बे हायकोर्टने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार ‘सफाई कामगार’ या पदासाठी ही भरती होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पात्र उमेदवार हा किमान ७ वी इयत्ता उत्तीर्ण असावा. तसेच शौचालय व स्नासगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा व मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

वयाची अट : ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.प्रबंधक, मूल शाखा, उच्च न्यायालय , पहिला मजला, PWD बिल्डिंग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now