जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील शिवाजीनगर येथे काही कारण नसताना तीन जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
शिवाजीनगर येथे रोहित संजय आकोलकर (वय २१) हा तरुण वास्तव्यास आहे. तो मंगळवार २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील मारुती मंदिराजवळ उभा असतांना बबलू हिरामन जोहरे ऊर्फ चॉपर बबल्या रा. हुडको शिवाजीनगर याच्या आणखी दोन जणांनी काही एक कारण नसतांना रोहित आकोलकर याला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत एकाने रोहित याच्या कमरेच्या खाली नाजूक भागावर धारदार शस्त्राने वार करुन दुखापत केली.
याप्रकरणी दुसऱ्या दिवशी रोहित आकोलकर याने शहर पोलिसात तक्रार दिली. यावरुन बलू हिरामन जोहरे ऊर्फ चॉपर बबल्या रा. हुडको शिवाजीनगर आणखी दोन जण अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक वैशाली पावरा हे करीत आहेत..