शिरसाळा मारूतीच्या दर्शनासाठी निघालेल्या दोघा भावंडांसोबत रस्त्यातच घडलं भयंकर..

ऑगस्ट 27, 2023 10:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२३ । जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबता थांबत नाहीय. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. यातच शिरसाळा येथील मारूती दर्शनासाठी दुचाकीने जाणाऱ्या सावदा येथील दोन सख्ख्या चुलत भावांना अज्ञात वाहनाचे जोरदार धडक दिल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील बहार्डी (ता.भुसावळ) गावानजीक घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

road accident jpg webp

सावदा येथील कुंभारवाड्यातील चार मित्र बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारूतीच्या दर्शनासाठी जात होते. यात भास्कर कुंभार आणि त्याचा चुलत भाऊ लखन कुंभार यांच्या दुचाकीला बहार्डी गावानजीक एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात भास्कर कुंभार याचा जागीच मृत्यू झाला तर लखन कुंभार हा जखमी झाला. त्याला तातडीने भुसावळ येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे आधार होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याच दिवशी जामनेर शहरानजीक शिरसाळा येथे मारूतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे शनिवार हा घातपात ठरला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now