अल्पवयीन मुलीस पळविले; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । यावल येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 06T115453.161 jpg webp

यावल शहरातील एका कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यस आहे. दि. ४ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास या अल्पवयीन मुलीस कुणीतरी अनोखळी इसमाने पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या काकांनी दि. ५ रोजी यावल पोलिसात फिर्यादी दिली. त्यानुसार अनोळखी इसम विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास अंमलदार असलम खान, दिलावर खान करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now