⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | नगरदेवळ्याला भाजपातर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबीर!

नगरदेवळ्याला भाजपातर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबीर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यात या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नगरदेवळा येथे भारतीय जनता पार्टी व पुणे अंदजन मंडळ संचलित कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र आखतवाडेत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आले. या शिबिरात सुमारे ३५० गरजू रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली असून १४० रुग्णांची लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

खासदार उन्मेष पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी नगरदेवळा शहर व नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गट मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. नगरदेवळा शहरासह परिसरातील गरजू नागरिकांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, सेवा पंधरवाडा समितीचे तालुका संयोजक सुनील पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा काटकर, नामदेव पाटील, भरत पाटील, वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र पाटील, किरण काटकर, राजेंद्र पवार, राजेंद्र महाजन, सुनील राऊळ, बापू चौधरी, मनोज पाटील, किशोर पाटील, शंकर राऊळ, सागर पाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह