चितोड्यातील हनुमान नगरमधील पथदिवे सदस्याच्या पुढाकाराने सुरू

सप्टेंबर 22, 2022 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । यावल तालुक्यातील चितोडा येथील हनुमान नगरमधील अनेक पथदिवे गेल्या काही दिवसापासून बंद होते. बंद पथदिवे सुरू करण्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार वार्डातील सदस्याच्या पुढाकाराने पथदिवे सुरु करण्यात आले आहे.

images 8 jpeg webp

चितोडा येथील हनुमान नगरातील काही पथदिवे बंद होते. विशेष या भागातील सप्तशृंगी मंदिर जवळील पथदिवे देखील बंद होता. यामुळे या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. येत्या २६ सप्टेंबर म्हणजेच सोमवारपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रीनिमित्त गावातील सप्तशृंगी मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र मागील काही दिवसापासून मंदिर परिसरातील पथदिवे बंद होता.

नवरात्रपूर्वी सप्तशृंगी मंदिर परिसरातील पथदिवे सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वार्डातील सदस्य चंद्रकांत जंगले यांच्या पुढाकाराने पथदिवे सुरु करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now