⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

पाचोऱ्याला पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त होतोय सेवा पंधरवाडा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा जन्म दिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजे १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर हा कालावधी संपुर्ण देशात सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. पंधरवाड्याची सुरूवात आज भारतीय जनता युवा मोर्च्या पाचोरा च्या माध्यमातून पाचोरा येथील अटल भाजपा जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करून करण्यात आले होते. याशिबिराला भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रथमतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

यानंतर २५ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने वृक्षारोपण तर त्यानंतर ०२ आक्टोंबर पर्यंत स्वच्छता अभियानाने पंधरवड्याची सांगता करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिवशी पाचोरा तालुक्यातील भाजपा व संलग्न विविध आघाड्यांच्या ७५ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून रक्त संकलन करण्यात आले. प्रसंगी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सेवा पंधरवाडा तालुका संयोजक सुनिल पाटिल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन, कृ.उ.बा.मा.सभापती सतिष शिंदे, बन्सीलाल पाटील, विधाससभा क्षेत्रप्रमुख हिम्मत निकुंभ, शहराध्यक्ष रमेश वाणी, ता सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटिल, दिपक माने, युवा मोर्चाचे गणेश पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर,रवी पाटील,जगदीश पाटील,परेश पाटिल,विरेंद्र चौधरी,लकी पाटील,भरत पाटील,भावेश पटेल,अनिल चांदवाणी, ऍड.राजा वासवाणी, राकेश कोळी,बाळू धुमाळ,गौरव पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी रक्तदाते उपस्थीत होते.

तसेच रेडप्लस ब्लड बॅंकचे डॉ.भरत गायकवाड डाॅ.कैलास कैलास पेखले सीमा सावळे अंतिम मालाकार पायल कुंभारे प्रतिक्षा तूल प्राजक्ता टेंभरे यांनी यावेळी शिबिरांत रक्त संकलन केले.तसेच या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवा पंधरवाडा समितीचे तालुका संयोजक सुनील पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.