जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहराला पिंपराळा परिसराशी जोडणारे पिंपराळा रेल्वे गेट कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद झाले आहे. यामुळे बजरंग बोगद्यातून नागरिक प्रवास करत आहेत. यातच आता कोर्ट चौकासमोरही गटारीचे काम सुरू असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून कोणतेही वाहतूक होत नाही. पर्यायी सर्व वाहतूक ही या परिसरातील पर्यायी रस्त्यावरून वाहतूक करत आहेत. यामुळे ते रस्ते सुद्धा खराब झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाने पिंपळा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद केले आहेत. त्यामुळे भोईटे नगर पासून ते थेट निमखेडी व पिंपळा गावाकडील वाहतूक बजरंग बोगदा यामधून सुरू झाली आहे. अश्यावेळी गणेश कॉलनी रस्त्या वरील वाहतूक दुपटीने वाढली आहे. मात्र नूतन मराठा कॉलेज आणि कोर्ट चौकामध्ये सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूकही काही दिवसांकरिता वळविण्यात आली आहे. यामुळे या संपूर्ण परिसरातील गल्लीबोळ्यांमधूनच जळगाव शहरातील मुख्य वाहतूक सुरू झाली आहे. ज्यामुळे हे रस्तेही खराब होत आहेत.
रस्ते खराब
जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या हालत खराब झाली आहे, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र जळगाव शहरातल्या मुख्य रस्त्यांहूनही अधिक खराब हे जळगाव शहरातले गल्लीबोळ्यातले रस्ते आहेत. हे देखील तितकेच खरे आहेत. अशावेळी या खराब रस्त्यांमुळे जळगाव शहरातल्या नागरिकांना वाहतुकी वेळी अडथळा निर्माण होत आहे.