भारतीय टपाल विभागात 10वी ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी.. आताच अर्ज करा

सप्टेंबर 8, 2022 5:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय टपाल विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी मेगाभरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार दहावी पास किंवा पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार 23 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत साइटवर या भरती मोहिमेशी संबंधित माहिती तपासू शकतात. ​India Post Recruitment 2022

post office

रिक्त जागांचा तपशील :
भारतीय टपाल विभागानं काढलेल्या भरती मोहिमेद्वारे टपाल विभागात पोस्टमन, मेल गार्डसह 98,083 पदं भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
अधिसूचनेनुसार, 10 वी / 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साईटची मदत घेऊ शकतात.

वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया :
या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल.

परीक्षा फी : फी नाही

कसा कराल अर्ज?

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत साइटला भेट द्यावी आणि संबंधित माहिती आधी मिळवावी. त्यानंतरच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरून तो मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बंगळुरू-560001 कडे पाठवणं आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now