ग्रॅज्युएट पास आहात का? सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 5212 पदांसाठी बंपर भरती

सप्टेंबर 20, 2022 2:08 PM

बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ५ हजाराहून अधिक पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना (SBI Clerk Recruitment 2022) जारी केली आहे. पदवी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची सुरुवात 07 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

sbi jpg webp

एकूण जागा : ५२१२

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वय श्रेणी :
वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा २८ वर्षे ठेवण्यात आली आहे.

ही निवड प्रक्रिया असेल
प्रिलिम्स परीक्षा 2022
मुख्य परीक्षा 2022
भाषा चाचणी 2022

परीक्षा फी :
अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, SC/ST/PwBD/ESM/DESM श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तर सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now