जि.प.जळगाव येथे खासदार रक्षा खडसे यांची विविध विषयांवर आढावा बैठक
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । जि.प.जळगांव येथे आज खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक मिनल कुटे यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक घेऊन रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध विषय बाबत माहिती घेतली.
यावेळी सध्या जिल्ह्यात गुरांवरील लम्पी हा आजार आलेला असुन, त्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येत आहे व आतापर्यंत जिल्ह्यातील किती गुरांना लसिकरण करण्यात आले, तसेच केंद्र सरकारची श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन योजना बाबत व रावेर लोकसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर व यावल येथील रिक्त असलेले गट विकास अधिकारी यांचे पद व जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी माहिती घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करणे बाबत संबधितांना सुचना केल्या.