भाजपची बंडखोरांवर मोठी कारवाई; जळगावमधील दोघांसह 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी

नोव्हेंबर 6, 2024 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीवेळा पक्षविरोधात कारवाई करणाऱ्या बंडखोरांवर भाजपने मोठी कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल ४० जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली असून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात जळगाव शहरातील दोघांचा समावेश आहे.

BJP

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसह महाविकासाआघाडीत बंडखोरी पाहायला मिळाली. महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता भाजपनेही कारवाईचे हत्यार उगारलेय.

बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर अखेर भाजपकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी केली आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ४० जणांमध्ये जळगावमधील मयूर कापसे आणि आश्विन सोनवणे यांचीही पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईने चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.

कुणावर कारवाई ?
धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
अकोट – गजानन महाले
वाशिम – नागेश घोपे
बडनेरा – तुषार भारतीय
अमरावती – जगतीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद गडरेल
साकोली – सोमदत्त करंजेकर
आमगाव – शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
घणसांवगी – सतीश घाटगे
जालना – अशोक पांगारकर
गंगापूर – सुरेश सोनवणे
वैजापूर – एकनात जाधव
मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
बागलान – आकाश साळुंखे
बागलान – जयश्री गरुड
नालासोपारा – हरिष भगत
भिवंडी – स्नेहा पाटील
कल्याण – वरुण पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू
अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
नेवासा – बाळासाहेब मरकुटे
सोलापूर – शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनिल बंडकर
श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
सावंतवाडी – विशाल परब

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now