कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 608 जागांवर भरती सुरु
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणांना एक मोठी संधी चालून आलीय. कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II या पदासाठी ही भरती होईल.
तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असल्यास तुम्हाला esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी ३१ जानेवारी २०२५ आधी अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या भरतीद्वारे ६०८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ज्यात सामान्य प्रवर्गातील २५४ जागा रिक्त आहेत. राखीव प्रवर्गासाठी ३४९ जागा रिक्त आहेत.या नोकरीमध्ये दिव्यांगांसाठी ९० पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी.
शैक्षणिक पात्रता:
(i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य. (iii) ज्या उमेदवारांची नावे अनुक्रमे CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या प्रकटीकरण यादीत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
तुम्हाला किती पगार मिळेल? आणि निवड कशी होईल?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा