जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि (Thane District Central Co-Op Bank) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Thane DCC Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 असणार आहे. Thane DCC Bank Recruitment 2022

एकूण पदसंख्या : 288

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 ज्युनियर बँकिंग असिस्टंट 233
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MSCIT केलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
2 शिपाई 55
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट: 26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे.
परीक्षा फी :
पद क्र.1: ₹944/-
पद क्र.2: ₹590/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022 (04:00 PM)
इतका मिळणार पगार
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक 15,000/- रुपये प्रतिमहिना
शिपाई (Peon) – 10,000/- रुपये प्रतिमहिना












