⁠ 
बुधवार, मे 8, 2024

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर भुसावळ विभागातून धावणाऱ्या ३६ रेल्वे गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । गणेशोत्सव (Ganeshotsav) अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर भुसावळ विभागातून अनेक गाड्या रद्द करण्यात आले आहे. छत्तीसगडमधील दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे झाेनमधील बिलासपूर विभागातील इंगूर स्टेशन ते रायगड झारसीगुडा सेक्शनमध्ये चाैथ्या लाइनचे काम सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत. यामुळे पुणे, मुंबई, अहमदाबादकडे जाणाऱ्यांची गैरसोय होईल.

गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रसार असल्याने या सणावर निर्बंध आले होते. यंदा कोरोना कमी झाल्याने गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. मात्र यादरम्यान, भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने पुणे, मुंबई, अहमदाबादकडे जाणाऱ्यांची प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

या गाड्या झाल्या रद्द
संत्रागाची-पुणे (२० व २७), पुणे-संत्रागाची (२२ व २९), शालिमार-पाेरबंदर (२६ व २७), पाेरबंदर-शालिमार (२४ व २५), पुरी-जाेधपूर (२४), जाेधपूर-पुरी (२७), शालिमार-अाेखा (२३ व ३०), ओखा-शालिमार (२१ व २८), मालदा टाऊन-सूरत (२० व २७), सूरत-मालदा टाऊन (२२ व २९), हावडा-पुणे- हावडा (दाेन्ही बाजूची २१ व २८), संत्रागाची-पाेरबंदर (२८), पाेरबंदर-संत्रागाची (२६), संत्रागाची-एलटीटी (२६ व २७), एलटीटी-संत्रागाची (२४ व २५), भुवनेश्वर-एलटीटी (२२,२५,२९), एलटीटी-भुवनेश्वर (२४,२७ व ३१), हटिया-एलटीटी (२६,२७), एलटीटी-हटिया (२८ व २९), हावडा-शिर्डी साईनगर (२५), साईनगर शिर्डी-हावडा (२७), हावडा-मुंबई (२६), मुंबई-हावडा (२८), एलटीटी-कामाख्य (२० व २७), कामाख्य-एलटीटी (२३ व ३०), हावडा-मुंबई मेल (२१ ते २८ आठ दिवस), मुंबई-हावडा मेल (दि. २१ ते २८ आठ दिवस), अहमदाबाद-हावडा, हावडा-अहमदाबाद, शालिमार-एलटीटी व एलटीटी-शालीमार या गाड्या (२१ ते २८), हावडा-पुणे (२०,२५,२७), पुणे-हावडा (२२,२७, २९), हावडा-मुंबई (२२,२३,२४,२६), मुंबई-हावडा (२३,२४,२५, २८), हटिया-पुणे (२२,२६,२९), पुणे-हटिया (२४,२८ व ३१).