जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । दि. 13 ऑगस्ट रोजी ‘द युनिक अकॅडमी जळगाव शाखेच्या वतीने युनिक अकॅडमी चे संस्थापक संचालक व लेखक तुकाराम जाधव यांचे एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केलेली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील गरुड़ होते सर्वप्रथम नवीन प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रस्तावना प्राध्यापक राहुल पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यशाळेचा उद्देश त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. त्यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जळगाव द युनिक अकॅडमी चे समन्वयक प्रा. विकास गिरासे, प्रा. प्रमोद सोनवणे, सुशील अहिराव, प्रा. प्रीती तारकस, प्रा. अंकुश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तुकाराम जाधव हे स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे लेखक असून अतिशय गाडे अभ्यासक आहेत त्याच्यानंतर कार्यशाळेला मार्गदर्शन करीत असताना MPSC व UPSC या सान्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप काळानुरूप बदल झालेले असून त्यासाठी आता विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा खोलवर अभ्यास करावा विशेषतः विश्लेषणात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी अनेक संदर्भ पुस्तक वापरावेत MPSC आणि UPSC च्या अभ्यासक्रमाच्या मध्ये जवळपास साम्य आले असून आता MPSC देखील UPSC च्या सारखीच किंवा त्या धरतीवरच MPSC च्या परीक्षा होती त्यासाठी विदयार्थ्यांनी प्रबळ आत्मविश्वास ठेवून अभ्यास करावा म्हणजे यश प्राप्त MPSC, UPSC स्पर्धा परीक्षांचे मनावर दडपण न ठेवता अभ्यास करावा त्यासाठी वृत्तपत्र, आंतरराष्ट्रीय घटना, देशांतर्गत होणाऱ्या घटना या साऱ्या बाबींचा सूक्ष्मरीत्या अभ्यास करावा असे आग्रहाचे प्रतिपादन यावेळी तुकाराम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. गिरासे यांनी आभार मानून केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पाटील, नीरज गवळी, टीना सुर्वे व समस्त टीम ने परिश्रम घेतले.