जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । एरंडोल येथे तालुका गृहरक्षक दलातर्फे हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातून गृहरक्षक जवानांची शानदार रॅली १३ ऑगस्ट २०२२ रोजी काढण्यात आली. रॅली च्या शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, कॉलेज शिक्षण संस्था अध्यक्ष अमित पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, आनंदा चौधरी. चिंतामण पाटील, सुरेश दाभाडे, शालिक गायकवाड, शेखर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते
या रॅलीत गृहरक्षक जवानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध घोषणा देऊन मरी माता चौक, बुधवार दरवाजा, भगवा चौक, राम मंदिर, पांडा वाडा रोड, विठ्ठल मंदिर, अमळनेर दरवाजा, महात्मा फुले पुतळा या मार्गाने रॅली नेऊन शेवटी रा.ती. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात रॅलीची सांगता करण्यात आली. विशेष हे की यावेळी काही गृहरक्षक दलाचे जवानांचे कुटुंबीय सुद्धा रॅलीत उस्फुर्त सहभागी झाले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी गृहरक्षक दलाच्या तालुकाध्यक्ष प्रवीण ढाकणे, गोविंद साळी, राजेंद्र पाटील, पंकज देशमुख, दिनेश पाटील, गुलाब चौधरी, रमजान दैवते, सोपान पाटील, यांनी परिश्रम घेतले जवळपास १०० पेक्षा अधिक गृहरक्षक जवान या रॅलीत सहभागी झाले.