⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | राष्ट्रीय | Amazon Smartphone Upgrade Sale : मिळतोय तब्बल ४० टक्के डिसकाऊन्ट

Amazon Smartphone Upgrade Sale : मिळतोय तब्बल ४० टक्के डिसकाऊन्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । सर्वसामान्य माणसाला आवडणारी सर्वात मोठी गोष्ट कोणती? तर ती म्हणजे डिस्काउंट. डिस्काउंट कोणताही असो माणसं किंबहुना नागरिक लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी काही ना काही खरेदी करतात. मात्र जर नागरिकांना फोनवर म्हणजेच मोबाईलवर तब्बल 40% डिस्काउंट मिळणार असेल तर? यासारखी पर्वणी दुसरी कोणतीही नाही. आणि देशातील एका अग्रेसर ऑनलाईन साईटने मोठा डिस्काउंट नागरिकांपुढे ठेवला आहे.

ॲमेझॉन इंडियावर ‘स्मार्टफोन अपग्रेड सेल’ सुरू झाला आहे. 14 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. वन प्लस सॅमसंग यासारख्या नामांकित नावाजलेल्या कंपन्यांच्या फोनवर तब्बल 40% डिस्काउंट देण्यात आला आहे. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती माहिती आहे? (Amazon Smartphone Upgrade Sale)

14 ऑगस्टपर्यंत वन प्लस (1+) टेन टी 10t या मोबाईल फोनवर तब्बल पाच हजार रुपये बँक ऑफर मिळत आहे. याचबरोबर पाच हजार रुपयापर्यंत ॲडिशनल डिस्काउंट देखील मिळत आहे. जर तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी एम (Samsang Galaxi M) सिरीज वर बंपर डिस्काउंट हवा असेल तर यासारखी दुसरी संधी तुम्हाला मिळूच शकत नाही. M53 5G, आणि M52 या फोनवर तब्बल पाच हजार रुपयांचा डिस्काउंट तुम्हाला मिळाला आहे.

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला शाओमी (Xiaomi) स्मार्टफोन घ्यायचे असतील तर यापेक्षा भारी ऑफर तुम्हाला दुसरी कोणती मिळू शकतच नाही. रेडमीचा फोन तुम्हाला फक्त 6,999 रुपयात मिळणार आहे. याच बरोबर K50I 5G phone तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंट बरोबर केवळ 25 हजार 999 रुपयात मिळणार आहे.

याचबरोबर तुम्हाला पाच हजार रुपये इन्स्टंट डिस्काउंट, नो कॉस्ट ऑफर असे कित्येक फायदे या ऑफर मध्ये मिळणार आहेत. अशावेळी ज्या नागरिकांना फोन विकत घ्यायचा आहे. त्या नागरिकांसाठी याहून चांगली पर्वणी दुसरी कोणती असूच शकत नाही. यामुळे लवकरात लवकर जाऊन या डिसकाऊन्टचा लाभ घ्यावा.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह