⁠ 
रविवार, मे 19, 2024

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा. गोपीचंद धनगर यांनी मनोगत व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या सहज सोप्या भाषेत कविता लिहून मानवी जीवनाचे तत्वज्ञान मांडले. त्यामुळेच त्या श्रेष्ठ लोककवयित्री आहेर असे त्यांनी सांगितले. त्यांनी बहिणाबाई चौधरी यांची ‘मन वढाय वढाय’ ही कविता सादर केली. यावेळी सामाजिक शास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, डॉ. योगेश महाले, डॉ. चंद्रमणी लभाणे, प्रा. यशवंत सैंदाणे, प्रा. संजय हिंगोणेकर, डॉ. विलास धनवे, डॉ. पंडित चव्हाण, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. मनोज महाजन, डॉ. राजीव पवार, डॉ. लक्ष्मण वाघ, प्रा. दिलवरसिंग वसावे, प्रा. राजेश सगळगिळे, डॉ. योगिनी राजपूत, डॉ. गायत्री खडके, डॉ. विशाल देशमुख, डॉ. नितीन चौधरी, डॉ. अखिलेश शर्मा, डॉ. नासिकेत सूर्यवंशी, डॉ. सागर बडगे, सुभाष तळेले, युवराज चौधरी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. गोपीचंद धनगर यांनी मानले.