जळगाव शहर

यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे – आनंदराव जाधव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । स्वतःचे ध्येय कसे निवडावे, निवडलेले ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यास करताना मनाची एकाग्रता, अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास , इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम करणे आवश्यक असते. यश मिळवण्यासाठी स्व- प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी स्वतःमधील सामर्थ्य, स्वतःच्या अभ्यासातील कमतरता व मर्यादा विचारात घेऊन अभ्यासाचे व वेळेचे सुयोग्य नियोजन करून आत्मविश्वासाने अभ्यास केल्यास यश किंवा ध्येय हमखास मिळवता येते हे स्पष्ट केले. त्यासाठी आपण स्वतःचे शारीरिक, मानसिक भावनिक व सामाजिक स्वास्थ्य जपणे आवश्यक असते असे प्रतिपाद आनंदराव जाधव यांनी केले.

विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ध्येय निश्चिती व ध्येय आरेखन या विषयी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. तसेच यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम स्वयंस्फुर्तीने अभ्यास प्रामाणिकपणे केल्यास ठरवलेले ध्येय मिळवता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या पालकांची व शिक्षकांची आवश्यकतेनुसार व गरजेनुसार मदत घेणे फायदेशीर ठरते. हे उदाहरण देऊन व स्लाईड शोच्या माध्यमातून स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील सर समन्वयिका वैशाली पाटील दीदी,जयश्री वंडोळे दिदी,शिक्षक श्री. सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे , श्रीराम लोखंडे , सुयोग गुरव व सौ पुनम खर्चाने दिदी इत्यादी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button