⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | ‘हा’ शेअर एका वर्षात 5 रुपयांवरून 1900 रुपयांच्या पुढे पोहोचला, गुंतवणूकदारांची झाली चांदी

‘हा’ शेअर एका वर्षात 5 रुपयांवरून 1900 रुपयांच्या पुढे पोहोचला, गुंतवणूकदारांची झाली चांदी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । शेअर बाजारातील चढ-उताराच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पेनीस्टॉक शेअरबाबत सांगणार आहोत ज्याने एका वर्षात गुंतवणूकरांना करोडपती बनविले आहेत. हा शेअर एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा आहे.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या या स्टॉकने गेल्या काही महिन्यांतील परताव्याच्या सर्व नोंदी मागे टाकल्या आहेत. ज्याने ऑक्टोबर 2021 मध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याच्या शेअर्सची किंमत 1.5 कोटींहून अधिक आहे. मात्र, काही दिवसांपासून या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तरीही, तज्ञ याबद्दल उत्सुक आहेत. कारण अजूनही हा शेअर तेजीत आहेत.

एक लाख रुपायचे झाले दीड कोटी
28 ऑक्टोबर 2021 रोजी, शेअरची किंमत NSE वर 4.95 रुपये होती. 8 ऑगस्ट 2022 रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात स्टॉक रु 756.30 वर बंद झाला. या शेअरने 9 महिन्यांत सुमारे 15 हजार टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच 28 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला 20,202 युनिट्स मिळाले असतील. आज या शेअरचे इतके युनिट्स (20,202) वाढून सुमारे 1.5 कोटी झाले आहेत.

शेअरची उच्च आणि निम्न पातळी
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,975.80 रुपये आहे. ज्याने हा शेअर 5 रुपयांच्या पातळीवर विकत घेतला आणि 1,975 रुपयांच्या पातळीवर विकला, त्याला मजा येत आहे. एप्रिल महिन्यात या शेअरने विक्रमी पातळी गाठली. मात्र, त्यानंतर शेअरचे भाव खाली येत आहेत. या समभागाची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 4.95 रुपये आहे. जर कोणी हा स्टॉक उच्च पातळीवर विकत घेतला असता तर आज तो खूप तोट्यात गेला असता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.