जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । एरंडोल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत रा.ती काबरे विद्यालयाच्या प्रांगणात ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगानाचा सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, शासनाचा ऐनवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम स्थगित करण्याचा आदेश प्राप्त झाल्यामुळे त्या ऐवजी उपस्थित मान्यवर,अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक यांनी पर्यावरण शपथ घेतली.
नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक हितेश जोगी यांनी उपस्थितांना शपथ दिली .यावेळी पॅन कार्ड व आधार कार्ड जोडणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले. यावेळी काही चिमुरड्यांनी राष्ट्रपुरुष, व समाज सुधारक यांची वेशभूषा साकारली होती. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहायक पोलीस निरीक्षक अहिरे पोलीस उपनिरीक्षक बागल, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील. गटविकास अधिकारी महाजन. पाटबंधारे उपविभाग विभागाचे उपविभागीय अधिकारी एस आर पाटील. एरंडोल महाविद्यालयाचे प्राचार्य एन ए पाटील, काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानधने, अंजुषा चव्हाण , किरण पाटील,आर.एस पाटील, के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक दीनानाथ पाटील, बचपन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, अधिकारी , प्राध्यापक शिक्षक, पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, साफसफाई कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरातील महाविद्यालय सर्व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाजगी प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यम शाळा या संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले.