जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरातील विकास कामांवरून महापालिकेविरुद्ध (Jalgaon Municipal Corporation) नेहमी आरोड होत असते. त्यातच नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असलयाने जनतेत प्रचंड राेष निर्माण होत आहे. पालिकेत तब्बल ४० टक्के कर्मचारी अपूर्ण आहेत. यावर ताेडगा म्हणून तात्पुरत्या स्वरूपात एजन्सीमार्फत १२५ पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यात अत्यावश्यक असलेले १३ कनिष्ठ अभियंते, ४० लिपिक व संगणक ऑपरेटर, ८ आराेग्य निरीक्षकांचा समावेश असेल.
महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत नवीन आकृतिबंध मंजूर हाेऊ शकलेला नाही. गेल्यावर्षी नाेव्हेंबर २०२१ मध्ये मनपा प्रशासनाने आकृतिबंध तयार करून नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. त्यातील चुकांची दुरुस्ती झाली आहे; परंतु राज्य शासन आकृतिबंध मंजुरीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नसल्याने जनतेत प्रचंड राेष निर्माण झाला आहेे. त्यामुळे महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात या समस्येवर ताेडगा काढला.
दरम्यान, महापालिकेच्या आस्थापनांवर २६३६ पदे मंजूर आहेत. सुधारित आकृतिबंध मनपाने मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला आहे. मंजूर पदांपैकी सध्या १५८३ पदे कार्यरत आहेत. तर २०५३ पदे रिक्त आहेत. महापालिकेत सध्या पाणीपुरवठा, बांधकाम विभागात केवळ १६ अभियंते कार्यरत आहेत. गेल्या दाेन महिन्यांत सहा अभियंते निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या दाेन्ही विभागातील अभियंत्यांकडे दाेन पेक्षा जास्त विभागांचा पदभार आहे. मनपात स्थापत्यसाठी ८, विद्युतसाठी २ तर मेकॅनिकल व अाॅटाेमाेबाइलसाठी प्रत्येकी एक कनिष्ठ अभियंता नियुक्त केला जाणार आहे. आराेग्य विभागात ८ स्वच्छता निरीक्षक भरतीचे नियाेजन केले आहे. १२५ पदांमध्ये संगणक तंत्रज्ञ, लिपिक टंकलेखक, वायमरन, पंप ऑपरेटर, वाहन चालक, व्हाॅल्व्हमन, मजुरांचा समावेश आहे.