---Advertisement---
जळगाव जिल्हा

प्रवीण चव्हाणांना धक्का : ‘या’ कारणामुळे केले दूर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी गंभीर आरोप केल्या नंतर ऍड. प्रवीण चव्हाण यांना धक्का बसला आहे. कारण त्यांना राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या भ्रष्टाचार प्रकरणातुन हवण्यात आले आहे. विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या पदावरून चौव्हाण हटविण्यात आले आहे.

pravin chauvhan jpg webp

अधिक माहिती अशी कि, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर खटला सुरू असून त्यात विशेष सरकारी वकील म्हणून चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता चौव्हाण यांच्या जागी या खटल्यात सरकारी वकील अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिसर यांनी याबाबत न्यायालयाला त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना सादर केली. चव्हाण हे २०१६ पासून काम पाहत होते.

---Advertisement---

चव्हाण यांनी भाजप नेत्यांना खोटया प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आ. गिरीश महाजन यांनी केला होता. मार्च महिन्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सभापतींकडे चित्रफीत सादर केली होती. त्याद्वारे चव्हाण हे भाजप नेत्यांना खोटया प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ही चित्रफीत महाजन यांच्याशी संबंधित असून त्यांनीही त्यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---