मोदी सरकारचा मोठा निर्णय ! तिरंगा फडकवण्याच्या नियमात केला ‘हा’ बदल

जुलै 24, 2022 3:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । केंद्रातील मोदी सरकारने तिरंगा फडकवण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आतापर्यंत जनतेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती. मात्र आता प्रत्येकजण आपल्या घरात रात्रंदिवस तिरंगा फडकवू शकतो.

indian flag jpg webp

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम सुरू करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे. पत्रात नवीन नियमांबाबत म्हटले आहे की, भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रध्वज कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या घरात फडकवला जात असेल तर आता तो दिवसरात्र फडकवता येईल.

पूर्वी तिरंगा फडकवण्याचा नियम काय होता?
यापूर्वी असा नियम होता की जेव्हा राष्ट्रध्वज एखाद्या मोकळ्या जागेवर फडकवला जातो तेव्हा तो सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत शक्यतोवर फडकवला जावा, मग हवामान कसेही असो.

‘हर घर तिरंगा’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि आपल्या घरात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृह सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत, प्रत्येक घरोघरी तिरंगा चळवळ बळकट करूया. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरात तिरंगा फडकावा. केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की सरकारला अपेक्षा आहे की 13 ऑगस्ट रोजी सुमारे 30 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now