Muktainagar News जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । सहलीचे फोटो मोबाईलवर व्हायरल करण्यावरून मुक्ताईनगरचे वातावरण चांगलेच तापले आहे. काल शुक्रवारी नगरसेविका पुत्राला पब्लीक मार दिल्याची घटना घडली. त्यांनतर खडसे समर्थक आक्रमक होऊन ऍड.रोहिणी खडसे यांच्यासह न्यायासाठी ठिय्या आंदोलनाल करण्यात आले. आता आ. एकनाथ खडसे देखील आक्रमक झाले असून नगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द झाल्याच्या संतापातून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप त्यानी केला आहे. तसेच त्यांनी पोलीसांवर देखील ताशोरे ओढले. ‘लाचार आणि हप्तेखोर’ पोलिसांमुळेच मुक्ताईनगर शहरात चुकीच्या घटना घडताहेत. तालुक्यात दोन नंबरचे धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुक्ताईनगरात संबंधित गुंडांकडुन नेहमी अशा प्रकारच्या घटना घडताहेत या गुंडांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी लवकरच औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करणार असल्याचे आ.खडसे यांनी सांगितले.
मारहाणीत जखमी झालेल्या नगरसेविका पुत्राची आ. एकनाथ खडसे यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सहलीचे फोटो मोबाईलवर व्हायरल करण्यावरून मुक्ताईनगरचे वातावरण चांगलेच तापले आहे. नगरसेविका पुत्राला पब्लीक मार दिल्यानंतर ऍड.रोहिणी खडसे यांच्यासह खडसे समर्थक काल न्यायासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाल केले होते. त्यानंतर या मारहाणीत जखमी झालेल्या नगरसेविका पुत्राची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा आ. एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी आ.एकनाथ खडसे यांनी फोटोमध्ये अश्लील असं काही नव्हतं अस परखड मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं.
दरम्यान, पोलीसांवर नाराजी व्यक्त करतांना सदर घटनेत, ‘कलम ३०७ दाखल आरोपी मारहाणीत सामील होते. पोलीसांसमोर मारहाण होत असतांना पोलीस हतबल का झाले? ‘नगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द झाल्याच्या संतापातुन माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप ‘त्यानी केला आहे. तसेच त्यांनी पोलीसांवर देखील ताशोरे ओढले. ‘लाचार आणि हप्तेखोर’ पोलिसांमुळेच मुक्ताईनगर शहरात चुकीच्या घटना घडताहेत. तालुक्यात दोन नंबरचे धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.मुक्ताईनगरात संबंधित गुंडांकडुन नेहमी अशा प्रकारच्या घटना घडताहेत या गुंडांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी लवकरच औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.