---Advertisement---
बातम्या

खिंडार पे खिंडार : मनपातील ‘इतके’ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । शिवसेनेला जळगाव जिल्ह्यात अजून एक धक्का बसला असून आता आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जळगाव शहर मनपातील दोन नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत.यामुळे शिवसेनेला आता अजून एक धक्का बसला आहे. शिवसेना नगरसेवक मनोज चौधरी, गणेश सोनावणे यांनी गुलाबराव पाटील यांना समर्थन दर्शवले आहे.

mnp 1 jpg webp

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंड केलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तब्बल शिवसेनेचे ४० आमदार फोडत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले या ४० आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ५ आमदारांचा समावेश आहे. अशावेळी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडणार यात वाद नाही. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडताना दिसत आहे. जळगाव शहर मनपामधून आता पर्यंत बंडखोरांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र आता शिवसेना नगरसेवकांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला आहे.

---Advertisement---

सर्वप्रथम नगरसेवक चेतन संकत, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, दीपक सपकाळे, नवनाथ दारकुंडे या सगळ्या नगरसेवकांनी शिंदेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर नगरसेवक प्रवीण कोल्हे, उषा पाटील, सुनील पाटील यांनी देखील शिंदे गटाला आपले समर्थन दर्शवले होते. आता यात अजून दोन नगरसेवकांचा समावेश झाला आहे. शिवसेना नगरसेवक मनोज चौधरी, गणेश सोनावणे यांनी गुलाबराव पाटील यांना समर्थन दर्शवले आहे.

धरणगाव मध्ये देखील खिंडार

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---