जळगाव लाईव्ह न्युज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आलेली आहे. सफाईगार या पदावर ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. District Court Amravati Recruitment 2022

पदाचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता/ पात्रता: प्रकृतीने सुदृढ
वयाची अट : ११ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती.
अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा












