जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट अधिक मजबूत होत आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला असता अशातच आता खासदारही शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे 18 पैकी 15 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली असल्याची चर्चा आहे. दोनतृतीयांश खासदारांचा वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्नात आहे. दरम्यान, हे खासदार शिंदे गटात गेल्यास उद्धव ठाकरे यांची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होऊ शकते.
शिवसेनेला दोन दिवसांत दोन धक्के बसले
याआधी बुधवारी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मोठा झटका बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात युवासेना नेते विकास गोगावले सामील झाले. विकास गोगावले यांचे वडील भरत गोगावले हे शिंदे गटाचे मुख्य व्हीप आहेत.गोगावले मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिसले. गुरुपौर्णिमेच्या आधी ते मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. या आठवड्यापर्यंत युवासेनेचे किमान 50 पदाधिकारी शिंदे गटात सामील होतील, असा दावा विकास गोगवाले यांनी केला.
गोगावले यांच्या आधी शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या माजी नगरसेवक शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते मंगळवारी शिंदे गटात सामील झाले. मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले
शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. याशिवाय भाजपच्या 106 आमदारांच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान आहेत. एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार पडले होते. ३० जून रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी डिप्पी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, इतर मंत्र्यांनी अद्याप शपथ घेतली नाही.