केळी उत्पादक शेतकऱ्यांना बोनस : केळीला मिळाला उचांकी भाव

जुलै 13, 2022 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ ।  बाजारात केळीची मागणी वाढल्याने आणि निर्मिती कमी झाल्याने केळीने‎ आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी २‎ हजार ७० रुपये क्विंटलचा भाव गाठला आहे.

banana tree

‎ गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात‎ केळीवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव‎ झाला. त्यात रावेर, यावल तालुक्यातील‎ सुमारे ५ हजार हेक्टरवरील रोग ग्रस्त‎ केळी शेतकऱ्यांनी उपटून फेकली.‎ यानंतर मे, जून मध्ये लागवड झालेली‎ केळी वातावरणातील बदलाने चार‎ महिन्यांत निसवण होऊन सात महिन्यांनी‎ म्हणजेच डिसेंबर, जानेवारीमध्ये कापली‎ गेली. यामुळे सध्या कापणी योग्य केळी‎ उपलब्ध नाही. नेमके या काळात‎ बाजारातून मागणी वाढल्याने केळीने‎ आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी २‎ हजार ७० रुपये क्विंटलचा भाव गाठला.‎

{ जुलै ते सप्टेंबरदरम्यान लागवड झालेल्या‎ केळीचा माल जून, जुलैमध्ये निघतो. यंदा‎ जूनमध्ये पाऊस नसल्याने माल तयार झाला‎ नाही. १० हजार केळी खोडातून ४ तेे ५‎ दिवसांआड १५० क्विंटल कापणी होते. यंदा ती‎ आठ दिवसांआड केवळ ५० क्विंटलपर्यंत होती.‎ { सोलापूर, कोल्हापूर, सूरत, दक्षिण भारत या‎ भागांतून केळी कापणी बंद आहे. यामुळे सध्या‎ केवळ जळगाव जिल्हा व मध्य प्रदेशातील‎ बऱ्हाणपूर परिसरातील केळी उपलब्ध आहे.‎ पण, हे प्रमाण कमी असल्याने केळी भावात‎ वाढ झाली आहे.‎ { उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख‎ भागात १५० क्विंटलच्या ५० ट्रक केळीची दररोज‎ मागणी असते. सध्या ती कायम आहे. मात्र,‎ केवळ १५ ते २० ट्रक केळीचा पुरवठा होत आहे.‎ मागणी असूनही आपण पुरवठा करु शकत‎ नाही, अशी स्थिती आहे.‎

८५ टक्के निर्यात बंद‎ रावेर, यावल तालुक्यातून इराण, इराक,‎ ओमान, दुबई आदी आखाती देशांमध्ये‎ केळीची निर्यात केली जाते. मात्र, निर्यात‎ दर्जाची केळी उपलब्ध नाही. परिणामी‎ ८५ टक्के निर्यात बंद झाली आहे.‎ जळगावातून देशांतर्गत केळीचा पुरवठा‎ कमी झाला आहे. सध्या फिलीपिन्स,‎ कोलंबिया, पनामा या देशांतून अरब‎ देशांना केळीचा पुरवठा होत आहे.‎

सात वर्षांतील उच्चांकी दर‎
‎२०१६ – ‎१२७५ ‎
२०१७ ‎-१५५०
२०१८ ‎-१५००
२०१९ ‎-१६१० ‎
२०२० -‎१३००
‎२०२१ – ‎१३१० ‎
२०२२ ‎-२०७०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now