तुझ्या बायकोच्या शिव्या ऐकून मला जगण्याची इच्छा नाही… सुनेच्या जाचाला कंटाळून सोडले घर

जुलै 5, 2022 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । सुनेच्या जाचाला कंटाळून सासू राहत्या घरातून निघून गेली. मात्र, जाताना तिने घरात चिठ्ठी लिहून आपली आतबीती जगासमोर आणली आहे. बाळा तुझ्या बायकोच्या शिव्या ऐकून मला जगण्याची इच्छा नाही. मला मारण्याचा प्रयत्न झाला, अंगावर हात टाकला तरी मी तुझ्यासाठी सहन करत राहिली. तुझ्या बायकोची तोंड बघण्याची इच्छा नाही, मला जगायचे सुद्धा नाही. अश्या प्रकारची चिठ्ठी पोलिसांना मिळून आली आहे.

home out jpg webp

अलकाबाई उत्तम चौधरी (वय ५५) असे या महिलेचे नाव आहे. चाळीसगाव च्या टाकळी प्र.चा येथील शिवशक्ती नगरात हा प्रकार उघडीस आला आहे. या महिलेने सुनेच्या जाचाला कंटाळून घर सोडले. सासू घरी नसल्याने सुनेने परिसरात शोध घेतला. तसेच तिच्या मुलगा गोकुळ पाटील याने देखील शोध मात्र आई मिळून न आल्याने चाळीसगाव शहर पोलिसांत आई बेपत्ता झाल्याची खबर दिली.

दरम्यान, स्वयंपाक घरात अलकाबाई यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात म्हटले आहे. गोकुळ तुझ्या बायकोच्या शिव्या ऐकून मला जगण्याची इच्छा नाही. मला मारण्याचा प्रयत्न झाला, अंगावर हात टाकला तरी मी तुझ्यासाठी सहन करत राहिली. तुझ्या बायकोची तोंड बघण्याची इच्छा नाही, मला जगायचे सुद्धा नाही. अश्या प्रकारची चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील पोहेकॉ तपास अजय मालचे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now