⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | महाराष्ट्र | उपमुख्यमंत्री होण्याबाबत फडणवीसांना कोणी फोन करून सांगितले? समोर आली ‘ही’ मोठी बातमी

उपमुख्यमंत्री होण्याबाबत फडणवीसांना कोणी फोन करून सांगितले? समोर आली ‘ही’ मोठी बातमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय पेच बहुधा संपुष्टात आला आहे. ही राजकीय लगबग एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी होती. आता या संपूर्ण घटनेवर पडदा पडू लागला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, महाराष्ट्रात जे काही राजकीय घडामोडी घडल्या, त्याची प्रत्येक क्षणाची माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली जात होती. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही प्रकारचे पद घ्यायचे नव्हते पण शेवटच्या क्षणी दोनदा PM मोदींचा फोन आला आणि ते टाळू शकले नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात भाजपनेही ९० टक्के निर्णय फडणवीसांवर सोडले होते. त्यामुळेच गेल्या १५ दिवसांपासून फडणवीस महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून होते. एवढेच नव्हे तर सरकारबाहेर राहून फडणवीस यांना शिंदे यांना पाठिंबा द्यायचा होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, फडणवीस यांना लूपमध्ये ठेवण्यात आले नाही, असे म्हणणे फारच दूरचे आहे.

पंतप्रधान मोदींनी दोनदा फोन केला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये कोणतेही पद घ्यायचे नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोनदा फोन केला. फडणवीस पंतप्रधान मोदींची चर्चा टाळू शकले नाहीत आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फडणवीस यांना ट्विटरवरून आवाहन केले आहे.

पक्षाने निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती. ते सरकारचा भाग न राहण्याची घोषणा करतील हे कोणालाही माहीत नव्हते. मात्र, पक्षाने त्यांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.