IRCTC Tour Package : स्वस्तात थायलंडला भेट देण्याची संधी, जाणून घ्या ‘या’ पॅकेजबाबत..

जून 26, 2022 1:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । कोरोना महामारीमुळे लोक अनेक महिने घरातच राहिले. मात्र, आता कोरोना कमी झाल्याने अनेक जण बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय. अशात जर तुम्ही थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी परवडणारे पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेज अंतर्गत, तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस थायलंडला भेट देण्याची संधी मिळेल. IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला ऑगस्ट महिन्यात बँकॉक आणि पटाया नेले जाईल.

Thailand

हे पॅकेज 11 ऑगस्टपासून कोलकाता येथून सुरू होईल. या पॅकेजचे भाडे 38,068 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते. या टूर पॅकेज अंतर्गत, तुमची राहण्याची आणि खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था IRCTC द्वारे केली जाईल. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना कोलकाता ते बँकॉक आणि परत कोलकाता थेट विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

इतका येईल खर्च
पॅकेजच्या किमतीबद्दल सांगायचे तर, जर तुम्ही या ट्रिपमध्ये एकटेच प्रवास करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 44,200/- रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, दोन लोकांसह प्रति व्यक्ती भाडे 38,068 रुपये आहे. याशिवाय तीन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 38,068 रुपये मोजावे लागतील. बेड असलेल्या मुलासाठी 36,304 रुपये आणि बेडशिवाय 31,710 रुपये शुल्क आहे.

कसे बुक करायचे
आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाइटला ऑनलाइन भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now