मोठी बातमी : मुंबई सह ठाण्यात १४४ कलम लागू

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.तो म्हणजे मुंबईत आणि ठाण्यात १४४ कलम. म्हणजेच शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे.

police jpg webp

मुंबई पोलीस आयुक्त तसंच कायदा व सुव्यवस्थेचे उपायुक्त आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीअंती शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला.

स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम बैठका इत्यादी ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना. सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरित देण्याचे आदेश. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालींबाबत माहिती घेऊनय योग्य कारवाई करण्याचे आदेश. कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, तोडफोड करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षाता घेण्याचे निर्देश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now