⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | मैत्रीणीकडे जावून येते असं सांगून घरातून पडली बाहेर, नंतर आलीच नाही परत..

मैत्रीणीकडे जावून येते असं सांगून घरातून पडली बाहेर, नंतर आलीच नाही परत..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना पळवून नेत असल्याच्या घटना वाढतच चालल्या आहे. अशातच यावल तालुक्यातील दुसखेडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?
यावल तालुक्यातील दुसखेडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ जून रोजी सकाळी ११ वाता मैत्रीणीकडे जावून येते असे सांगून ती घराबाहेर पडली. दरम्यान सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त करत तिचा नातेवाईकांसह मैत्रीणींच्या घरी शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही.

पिडीत मुलीच्या भावाने फैजपूर पोलीस ठाण्यात येवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.