वीजबिल भरण्याची सक्ती करूनही पहिल्या पावसात अर्ध्या जळगाव शहराची बत्ती गुल्ल
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । रविवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरात पहिल्या पावसाने दमदार सुरुवात केली. मात्र कोसळणाऱ्या पावसाच्या सरीत नागरिकांकडून जब्बर वसुलीची सक्ती करणाऱ्या महावितरणने पहिल्या पावसासमोर गुडधे टेकलेच. यावेळी अर्ध्या जळगाव शहराची बत्ती गुल झाली होती. तब्बल ६ तास हि लाईट आलीच नाही.
जळगाव शहरात दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिक सुखावले पण या पावसामुळे जळगाव शहराचा तब्बल ६ तास खंडित झाला. वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणला याबाबाद माहिती विचारली असता त्यांनी उत्तर दिले कि, पावसाळ्यात हे होताच असते. त्यामुळे पहिला पाऊस आला कि लाईट जाणार हे सर्वश्रुत आहे. मात्र नागरिकांच्या मते वीजबिल भरण्याची सक्ती करणारे हे महावितरण आता का गप्प आहे ? हा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र दुपारी बरोब्बर २ वाजता संपूर्ण शहरात पाऊस पडला आणि लाईट गेली हि वास्तुस्थिती नाकारता येणार नाही.
शहरात प्रामुख्याने जुन्या जळगावात लाईट गेली होती. एकंदरीत पावसाने दिलासा दिला असला तरी महावितरणच्या गलथान कारभारामुळे रहिवाशांना अंधारात चाचपडत राहावं लागल हेच अंतिम सत्य आहे. शहरात अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.