MCGM Recruitment : संधी सोडू नका, मुंबई महापालिकेत मेगाभरती, 20000 पगार मिळेल

जून 10, 2022 6:17 PM

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Brihan Mumbai Mahanagarpalika) येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (MCGM Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. समुदाय संघटक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 असणार आहे.

MCGM Recruitment 2022

पदाचे नाव : समुदाय संघटक (Community Organizer) – एकूण जागा 113

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

०१) निम्नत्तम शैक्षणिक अर्हताः कोणत्याही शाखेतील पदवी तथापी, समाजशास्त्र विषयातील पदवी (BA.Sociology) अथवा समाजकार्य विषयातील पदवी (BSW) असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
०२) सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान २ वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक.
०३) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी टंकलेखनाचे प्रति शब्द ३० व इंग्रजी टंकलेखनाचे प्रति शब्द ३० प्रमाणपत्रास प्राधान्य.
०४) शासनाच्या नियमाप्रमाणे एम.एस.सी.आय.टी. (MSCIT) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा एम.एस.ऑफिस, पॉवर पॉईंट, वर्ड, एक्सेल यांचे ज्ञान आवश्यक. तथापी, संबंधित प्रमाणपत्र अनिवार्य,
०५) मराठीचे ज्ञान आवश्यक

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८.

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now