२७ वर्षीय विवाहितेची घरात गळफास घेत आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । पारोळा येथील सासर व शिरपूर येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेने, २३ रोजी सकाळी ६ वाजता लाल बाग परिसरातील घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत पारोळा पोलिसांत नोंद झाली.

suicide 7 jpg webp

आनंद दत्तात्रय पाटील (रा.शिरपूर) यांनी पारोळा पोलिसात खबर दिली. २३ रोजी त्यांचे मेहुणे जितेंद्र पाटील यांनी सकाळी फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. मृत विवाहितेच्या पश्चात दोन मुले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now