⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यात केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेने काढली महागाईची अंत्ययात्रा

पाचोऱ्यात केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेने काढली महागाईची अंत्ययात्रा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । झोपेचे सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात महागाईची अंत्ययात्रा शिवसेना कार्यालय येथून काढण्यात आली. ही अंत्ययात्रा महाराजा छत्रपती शिवाजी चौक येथून भाजी मंडी सोनार गल्ली जामनेर रोड येथून तहसील कार्यालय येथे सांगता करण्यात आली.

यावेळी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, झोपेचे सोंग घेणाऱ्या केंद्र सरकार ला जागे करण्यासाठी आपण ही अंत यात्रा काढली या अपयशी भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो ” पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. केंद्र सरकारच निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना,अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी किशोर पाटील आमदार, सुमित किशोरआप्पा पाटील, ऍड. अभय पाटील उपजिल्हाप्रमुख शिवसेना, शरद पाटील तालुका प्रमुख शिवसेना, किशोर बारवकर शहरप्रमुख शिवसेना, जितेंद्र जैन, युवासेना उपजिल्हाधिकारी, मुकुंद बिलदीकर ,बंडू चौधरी शहर प्रमुख शिवसेना, चंद्रकांत धनवडे, संदीपराजे युवासेना शहर प्रमुख, जितेंद्र पेंढारकर, पदमसिंग राजपूत, जि. प.सदस्य, अनिल सावंत, उपशहर प्रमुख, महेश सोमवंशी, सतिश चेडे, आयुब बागवान, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, नंदू पाटील, अमोल राजपूत, अनिल बच्छाव, पप्पू सैनदाने,सुमित सावंत, अंकुश,भरत खंडेलवाल ,बापू हटकर, राम केसवाणी, नितीन चौधरी, गजू पाटील, समाधान पाटील, पंकज जाधव, अजय पाटील, वाल्मीक पाटील, भैय्या सावळे, विशाल डॉन, अनिकेत सूर्यवंशी, सलीम कहाकर, वैभव राजपूत, डॉ. हेमराज पाटील, सूरज शिंदे,म अण्णा चौधरी, अनिल राजपूत (टिलू आप्पा), डॉ.भरत पाटील, भूषण पेंढारकर, आनंद पगारे, तात्या चौधरी, सागर पाटील, शाकीर बागवान,अक्षय जैन, जितू पाटील, महेंद्र पवार, विजय भोई, संजय सावंत, राहुल अग्रवाल, नितीन पाटील, दीपक पाटील.


महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मंदा पाटील, उप तालुका प्रमुख सुनंदा महाजन, शहर प्रमुख उर्मिला शेळके, उप शहर प्रमुख मालती हटकर, जया पवार, रेखा राजपुत, लता वाघ, जिजा निरावते, रेखा पारसीकर, बेबा पाटील, रत्ना पाटील, पदमा पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह