⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | एसटी कर्मचाऱ्यांचा प्रताप : डिझेलची केली परस्पर विक्री

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रताप : डिझेलची केली परस्पर विक्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । पाचोरा शहरातील जयप्रकाश पेट्रोलपंप येथून तीन जणांनी बसमध्ये न भरता इतर खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरले. यामुळे अश्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात महामंडळाच्या कर्मचाऱ्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव बसस्थानक आगारात संभाजी भास्कर काळे रा. सायगाव ता.चाळीसगाव हा नोकरीला आहे. १० मे ते १४ मे या कालावधीत संभाजी काळे याने चाळीसगाव शहरातील जयशंकर पेट्रोल पंपावर राज्यपरिवहन मंडळाचे बस क्रमांक (एमएच २० बीएल २४१२), (एमएच ४० एन ९८१६),(एमएच २० बीएल २३५७) आणि (एमएच २० बीएल ३५०७) क्रमांकाच्या बसमध्ये डिझेल न भरत परस्पर मौसीन सलीम शेख रा. जुना विमानतळे रेल्वे हाऊसिंग सो.चाळीसगाव आणि मयूर नामदेव म्हस्के रा. मराठी शाळेच्या मागे खरडई नाका चाळीसगाव यांच्या मदतीने खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरले

याप्रकरणी चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्ण निकम यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह