जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । आज दिनांक १५ मे रोजी मीना डोकानिया यांचे औक्षण करत पड्यावरील मुलांसोबत जन्मदिवसानिमित्त नायगावच्या लगत असलेल्या निंबा देवी जवळपासच्या परिसरात वास्तव्यात असलेल्या आदिवासी पाड्यांवर लहान मुलांना कपड्यांचे व फराळाचे वाटप करण्यात आले तसेच मुलांना आणि त्यांच्या परिवाराला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तेथील मुलांनी पावरा गीताचे सादरीकरण केले व हीच आमुची प्रार्थना घेत कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी छत्रछाया फाऊंडेशन चे सचिव रिद्धी वाडीकर, कोषाध्यक्ष सुनिता वाडीकर, सदस्य डॉ विवेक जोशी, हर्षल चौधरी, मीना डोकानिया, अर्जुन बडगुजर, निखिल पाटील, गुरु बारेला, सारंग कोळी, जमनादेवी, हिमानी वाडीकर व इतर लोकांनी परिश्रम घेतले.