जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । एरंडोल येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव यांचा पत्रक़ारिता क्षेत्रातील प्रदीर्घ (35 वर्षे) योगदान, उल्लेखनिय कामगिरीबद्दल सुर्योदय पत्रक़ारिता पुरस्कार दि. 8 मे 2022 रोजी मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. अहिरराव आणि सौ. शकुंतला अहिरराव दोघांनी पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रभाा गणोरकर, समारोपीय अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष दलूभाऊ जैन, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीष जैन, जळगांव शहराध्यक्ष साहेबराव पाटील यांचेसह डॉ. म. सू. पगारे, सुप्रसिध्द लेखक डॉ. विश्वनाथ शिंदे, लेखक अशोक कोतवाल, डॉ. नरसिंह परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कांताई सभागृहातील संमेलनास धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, नंदूरबारसह अनेक जिल्ह्यातील लेखक, कवी यांचा गौरव, पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. प्रा. शिवाजीराव अहिरराव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
हे देखील वाचा :
- राज्य सरकारकडून 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर
- केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी; आता पुढे काय?
- कडीकोंडा तोडून घरात प्रवेश घेतला, पण अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात फसला
- महाजेनकोमध्ये तब्बल 800 जागांसाठी जम्बो भरती; ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी, पगार 86000
- जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट