जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । एरंडोल येथे अखिल ब्रह्मवृंद, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व जय शनिमहाराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भगवान परशुराम यांची सजीव आरास साकारून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. वीरेंद्र दुबे याने भगवान परशुराम यांची व्यक्तिरेखा साकारली.
मिरवणुकीत ब्राह्मण समाजातील महिला व पुरुष पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले. शनी मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली. या कार्यक्रमा प्रसंगी रवींद्र कुलकर्णी, डॉ. तुषार वडगावकर, पांडे, बुंडले, देशपांडे यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पि.के. कुलकर्णी, प्रसाद दंडवते, अल्हाद जोशी, परेश पाठक, भूषण जोशी, राजू भागवत, शिरिष विंचुरकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा जोशी, महेश जोशी, निशा विंचुरकर, शिल्पा पाठक, जयश्री कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण समाज बांधव व भगिनीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर प्रसाद दंडवते यांच्याकडून सर्व उपस्थित समाज बांधवांना स्नेहभोजन देण्यात आले.