जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । गिफ्ट मिळेल असे सांगत अँड्रॉईड मोबाईलवर लिंक पाठवत शहरातील दोन जणांची ऑनलाईन फसवणूक झाली. दिलेल्या लिंकवर क्लिक करताच दोघांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पहिल्या घटनेत राहुल प्रमोद महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि ३० एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास त्याचे वडील प्रमोद महाजन हे घरी असतांना त्यांना मोबाईलवर २९५३७२३८५ या क्रमांकावरून अनोळकी व्यक्तीचा फोन आला होता. फोन उचाल्यावर प्रमोद महाजन यांना समोरील व्यक्तीने सांगितले कि, तुम्हाला गीफ्ट मिळणार आहे. लिंक पाठवतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला गिफ्ट मिळेल, असे सांगितले. प्रमोद महाजन यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या खात्यातून २६ हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. य प्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत लक्ष्मी निलेश राखोंडे यांची देखील ऑनलाईन फसवणूक झाली आहे. दि ३० एप्रिल रोजी दोन वाजेच्या सुमारास त्या घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा ७०९३६९८७३९ या क्रमांकावरून फोन आला. लक्ष्मी राखोंडे यांनी फोन उचल्यावर त्यांना समोरील व्यक्तीने सांगितले की, तुमचे लक्ष्मी किराणा दुकान असून तुम्हाला बिजनेस फोन-पेवर गीफ्ट मिळालेले आहे. मी तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा. सौ. राखोंडे यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांची कोटक महेंन्दा कंपनीचे वीजा कार्ड व खात्यातून ३७ हजार ४९५ रुअप्ये ऑनलाईन पध्दतीने रक्कम अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफर करून घेतलेली. या प्रकरणी देखील शनिपेठ पोलीस ठाण्यात लक्ष्मी राखोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहे.