⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | वरणगावमध्ये घरफोडी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

वरणगावमध्ये घरफोडी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । वरणगाव शहरातील महालक्ष्मी नगरात घरफोडी होऊन दीड लाखाचा ऐवज लंपास झाल्याची घटना २९ एप्रिलच्या रात्री घडली. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, हाती फारसे काहीही आले नाही.

महालक्ष्मी नगरमध्ये दिलीप प्रकाश सुतार हे कुटुंब राहते. ते २९ एप्रिलला कुटुंबीयांसोबत कुलर असलेल्या दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यांच्या घरातील बेडरूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. नंतर कपाटाच्या तिजोरीचा लॉक तोडून १ लाख ५७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. रात्री एक वाजेपर्यंत सुतार कुटुंबीय जागी होते. त्यामुळे चोरट्यांनी एक वाजेनंतर ही चोरी केल्याचा अंदाज आहे. ही माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळी बोटांचे ठसे घेण्यात आले. दरम्यान, वरणगावात रात्री शिवाजीनगर परिसरात सुद्धा चोरटे फिरत होते. मात्र, एका व्यक्तीने पोलिसांना फोन केल्यानंतर सायरनचा आवाज ऐकल्यावर त्यांनी पलायन केले. महालक्ष्मी नगरातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह